25.1 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home विदर्भ वाघाच्या हल्यात 9 वर्षीय बालिका गंभीर जखमी

वाघाच्या हल्यात 9 वर्षीय बालिका गंभीर जखमी

0
13

ब्रम्हपुरी,दि.25 :- तालुक्यातील जीचगाव येथील अरविंद मेश्राम यांची 9 वर्षाची मुलगी कु.सोनी ही घरातील अंगणात (दि.24) सायंकाळी 6 :30 वाजेच्या सुमारास खेळत असताना अचानक आलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला चढविला. मुलीने वाघाला पाहून जिवाच्या आकांताने आरडा ओरड करताच मुलीचे आई वडील व परिसरातील लोक धावून आले.आणि वाघाला हाकलून लावले त्यामुळे वाघ मुलीला गंभिर अवस्थेत सोडून पळून गेला.त्या मुलीला आरमोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.मात्र परिस्थिती बघता जिल्हा जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीला हलविण्यात आले. वाघाने तिच्या मानेला पकडून तिच्या छातीला व पाटीला ओरबडले.
12 फेब्रुवारीला कॉ. विनोद झोडगेच्या नेतृत्वात सुधीर मुनगंटीवार यांच्या घरावर मोर्चा काढून नरभक्षी वाघ व वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.यापूर्वी पद्मापुर येथील अनिता मोरेश्वर गेडाम ह्या महिलेचा नरभक्षी वाघाने बळी घेतलेला होता. पण अजूनही वन विभाग पाहिजे तेवढे लक्ष ह्या प्राण्यांचे बंदोबस्त करण्यासाठी देत नाही व अजूनही त्यांनी काहीही उपाय योजना केलेल्या नाही. हि खेदाची बाब आहे. परिसरातील जनता हि वाघाच्या दहशतीत जगत आहे. त्यामळे शासनाने व प्रशासनाने ह्याची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा किसान सभेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा कॉम्रेड विनोद झोडगे ह्यानी दिलेला आहे