26.6 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home गुन्हेवार्ता नागपुरमध्ये सेक्स रॅकेटवर छापा

नागपुरमध्ये सेक्स रॅकेटवर छापा

0
37

नागपूर,दि.27 – नवीन मनीषनगर येथील गुरुछाया सोसायटीमधील माउली अपार्टमेंट येथे सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेने छापा घालून एका महिलेसह तिघांना अटक केली. यावेळी आरोपींच्या ताब्यातून तीन अन्य राज्यांतील तरुणींसह चौघींना ताब्यात घेण्यात आले. क्रिष्णा ताराचंद मोटवानी (२४) सिंधी कॉलनी, चिखली (जि. बुलडाणा), रूपा ऊर्फ खुशी सुनील पीवाल (३०, शिवनगर, खामला) आणि रितेश ऊर्फ राज भावसिंग जाधव (२५) हिवरा तांडा, ता. आर्वी (जि. वर्धा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तीनही आरोपींनी सहा महिन्यांपूर्वी माउली अपार्टमेंट येथील दोन फ्लॅट प्रत्येकी सात हजारांत किरायाने घेऊन तेथे कुंटणखाना सुरू केला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी पश्‍चिम बंगाल येथील २ आणि दिल्ली व मुंबई येथील प्रत्येकी एका तरुणीला देहव्यापारासाठी या फ्लॅटमध्ये बोलविले. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी या तरुणींकडून ते देहव्यापार करून घेत होते. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त संभाजी कदम यांना ही माहिती समजताच पोलिस पथकाने धाडीची योजना आखली. पोलिसांच्या पंटरने रूपा ऊर्फ खुशी हिच्यासोबत तासाभरासाठी तीन हजारांत सौदा केला. त्यानंतर रूपाने एका तरुणीला पंटरच्या ताब्यात दिले. पंटरने इशारा करताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी फ्लॅटवर धाड घातली. या धाडीत पोलिसांच्या हाती चार तरुणी लागल्या. याप्रकरणी बेलतरोडी पोलिस ठाण्यात पीटा कायद्यान्वये क्रिष्णा, रूपा आणि रितेश अटक केली.