गोंदिया,दि.28ः- महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या मागणीचा सकारात्मक विचार करीत पुढच्यावर्षीपासून गोंदिया पंचायत समितींतर्गंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यासांठी सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे.पुरोगामी शिक्षक संघटना शाखा गोंदियाच्यावतीने यासंबधीचे निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले होते.त्यावर गटविकास अधिकारी यांनी हा निर्णय घेतला आहे.त्यासोबतच निवडश्रेणी,चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू झालेल्या शिक्षकांच्या नोंदी पुर्ण करुन थकबाकीसह पगारात लागू करणे.12 व 24 वर्ष सेवा पुर्ण झालेल्या शिक्षकांचे प्रशिक्षणाबाबत माहिती पुरविणे,अर्जित,वैद्यकिय व प्रसुतीरजा प्रकरणे निकाली काढणे,सेवापुस्तकामधील नोंदी पुर्ण करुन देणे,डीसीपीसीएसधारक शिक्षकांच्या पावत्या मिळणे,सहाव्या वेतन आयोगातील थकबाची रक्कम जमा करणे,एलटीसी कपातचे चालना मिळणे आदी मागण्याचे निवेदनही सादर करण्यात आले होते.यावेळी तालुकाध्यक्ष एस.एम.बिसेन,नेते डी.सी.रहागंडाले,उपाध्यक्ष प्रमोद बघेले,सरचिटणीस एस.पी.पटले,ममता भगत,विजयलता पोहरकर,कलावती कोल्हटकर आदींचा समावेश होता.




