गोंदिया,दि.२८ : –वारंवार पाठपुरावा करुनही वीज बिलांचा भरणा करण्यास टाळाटाळ करणार्या महावितरणच्या गोंदिया परिमंडळ क्षेत्रातील तब्बल ५ हजार १00 ग्राहकांचा वीज पुरवठा फेब्रुवारी महिन्यात आतापयर्ंत खंडित करण्यात आला आहे. ग्राहकांनी वीज बिलांचा नियमितपणे भरणा करून वीज पुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.महावितरणच्या गोंदिया परिमंडळ क्षेत्रांतर्गत घरगुती ग्राहकांची थकबाकी ३ कोटी ६५ लाख रूपये, वाणिज्यिक अंतर्गत २ कोटी ९५ लाख रूपये, औद्योगिक क्षेत्रातंर्गत ७३ लाख रूपयांची थकबाकी आहे. तर ग्रामीण व शहरी भागातील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महावितरणची थकबाकी ७३ लाख रूपये असून शहरातील पथदिवेची थकबाकी १५ लाख रूपये असून गोंदिया परिमंडळाची एकूण थकबाकी ८ कोटी २१ लाख रूपये आहे.
महावितरणच्या गोंदिया परिमंडळ क्षेत्रात १ फेब्रुवारी २0१९ रोजी देयमुदतीत वीज बिलांचा भरणा न केल्याने थकबाकीत असलेल्या घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे सुमारे १५ कोटी २६ लाख रुपयांची थकबाकी होती. यापैकी बहुतांश ग्राहकांनी दोन महिन्यांपासून त्यांच्या वीज बिलांचा भरणा केलेला नाही. महावितरणन ेसप्टेबर महिन्यापासून संपुर्ण राज्यभर सुरु केलेल्या केंद्री कृत बिलींग प्रणालीमुळे बिलींगची संपुर्ण प्रक्रिया महावितरणच्या सांघिक कार्यालयामार्फत राबविण्यात येत असल्याने थकबाकीदार ग्राहकांवरही सांघिक कार्यालयाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. थकबाकीचा वाढता बोझा लक्षात घेता महावितरणला आपला आर्थिक गाढाखेचणे तारेवरची कसरत ठरत आहे, वीजखरेदी, कर्मचार्यांचे वेतन, विविध विकास कामांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज देण्यात महावितरणची बहुतांश रक्कम खर्च होत होतो, यामुळे देखभाल व दुरुस्ती यासाठी महावितरण कडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने शंभर टक्के थकबाकी वसुलीसाठी महावितरण आग्रही आहे. ही वसूली करण्यासाठी गोंदिया परिमंडळ क्षेत्रांतर्गत असलेल्या गोंदिया व भंडारा मंडलामध्ये थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली. या मोहीमेत आता पयर्ंत ५ हजार १00 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. शून्य थकबाकीच ेलक्ष्य निर्धारित करीत ही मोहीम दिवसेंदिवस अधिक आक्रमक करण्याच्या स्पष्ट सुचना मुख्य अभियंता सुखदेव शेरकर यांनी सर्व क्षेत्रीय अधिकार्यांना दिल्या आहेत.
महावितरणच्या या विशेष मोहिमेत चालू महिन्यात आत्तापयर्ंत थकबाकीदार वीजग्राहकांपैकी ३ हजार ९४९ थकबाकीदारांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात आणि १ हजार १५१ थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेला आहे. उर्वरीत थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे काम सर्वत्र मोठय़ा प्रमाणात सुरु आहे. पाच हजारा वरील आणि एक हजारा वरील थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यास प्राधान्य देण्यात येत असून वसुलीबाबत निष्काळजी करणार्या अधिकारी-कर्मचार्यांवर कठोर कारवाई करण्याच ेनिर्देशही मुख्य अभियंता यांनी दिलेले आहे. महावितरणने यामोहीमेची अंमलबजावणी अधिक आक्रमकपणे सुरु केली आहे. ग्राहकांनी देय मुदतीच्या आत नियमितपणे वीज बिलांचा भरणाकरीत सहकार्य करावे आणि वीज पुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.





