पुरुषोत्तम माहेश्‍वरी यांचे निधन आज नांदेड येथे अंत्यसंस्कार

0
8

नांदेड,दि.28– नांदेड नगरपालिकेचे माजी अध्यक्ष तसेच नांदेड येथील विविध सामाजिक संटनेशी संबंधित असलेले पुरुषोत्तम जेठमल माहेश्‍वरी (वय 81) यांचे बुधवारी (दि.27) विद्यानगर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी (दि.28) दुपारी 1 वाजता नांदेड येथे गोवर्धन घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विदर्भातील उमरखेड येथील माजी आमदार कै. जेठमल माहेश्‍वरी यांचे चिरंजीव असलेले पुरुषोत्तम माहेश्‍वरी यांचे शिक्षण उमरखेड, नागपूर व अमरावती येथे झाले. त्यांच शिक्षण बी.ए. एलएलबी पर्यंत झाले होते. नांदेड येथील उस्मानशाही मिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी बरीच वर्षे काम केले. कै. राजा बन्सीलाल जैन यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. मील मधील नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी नांदेड नगरपालिका निवडणूक त्यावेळी लढवली. आणि नगराध्यक्षही झाले. नांदेड येथील महिला महाद्यिालयाचे ते सचिव होते. तसेच प्रतिभा निकेतन शिक्षण संस्थेचे सध्या अध्यक्ष होते. मुकबधीर विद्यालय व इतर अनेक संस्थांशी त्यांचा संबंध होता. पासदगाव येथील किडस् किंगडम या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्या मागे दोन मुले एक मुलगी नातु नातवंडे असा परिावर आहे. सन्मान कंस्ट्रक्शनचे बांधकाम व्यावसायीक सतिश माहेश्‍वरी व अमेरिकेतील मनिष माहेश्‍वरी यांचे ते वडील होत. किडस् किंगडम शाळेच्या प्राचार्या संध्या माहेश्‍वरी यांचे ते सासरे होत. पुरुषोत्तम माहेश्‍वरी यांना वाचनाचे विलक्षण वेड होते. प्रतिभा निकेतन शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य स.दि. महाजन व अनेक मान्यवरांनी माहेश्‍वर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे