38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home राजकीय सोनिया गांधी ऑगस्टपर्यंत तिहारमध्ये- स्वामी

सोनिया गांधी ऑगस्टपर्यंत तिहारमध्ये- स्वामी

0
16

– – वृत्तसंस्था
मुजफ्फरनगर – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या 15 ऑगस्ट पर्यंत तिहार कारागृहातील अतिथिगृहात भेटण्याची शक्‍यता आहे. यामुळे त्यांच्या पत्ता तिहार कारगृहामध्ये असणार आहे, असे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

रविवारी (का. 22) झालेल्या सभेदरम्यान बोलताना स्वामी म्हणाले, ‘विविध भागांमध्ये ज्यावेळी दौरा करत असतो, त्यावेळी नागरिक विविध प्रश्नांचा भडिमार करतात. वेगाने विकास होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे. भाजपची बंगळूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय बैठकीदरम्यान हा मुद्दा नक्कीच उपस्थित करणार आहे. परदेशातील काळा पैसा भारतात आणला जाईल. परंतु, यामध्ये काय अडचणी आहेत, याबाबत पंतप्रधानांना पत्र पाठवून सांगितले आहे.‘

blank