अपंगांच्या धोरणात बदल आवश्‍यक

0
14

पुणे – “अपंगांसाठी अर्थसंकल्पात तीन टक्के तरतूद असूनही ते खर्च होत नसल्यामुळे धोरणांमध्ये काही बदल करावे लागतील. त्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील आहे,‘‘ असे मत सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, बडोले यांच्या पत्नी शारदा बडोले , अपंग कल्याण आयुक्त नरेंद्र पोयाम, उपायुक्त विजया पवार, समाजकल्याण आयुक्त रणजितसिंह देवल, अपंग वित्त विकास महामंडळाचे संचालक सुहास काळे उपस्थित होते.
बडोले व बापट यांच्या हस्ते भागीनाथ विंचू, त्र्यंबक मोकासरे, चंद्रकांत भोसले, मुकेश वराळ, दिनेश मालशे, अजय गांधी, प्रकाश अवचाल, अजित कुंटे, मुकिंदा गोटे, गौतम लिमये, शैलेश नायडू, कौशिक चटर्जी आदींना “अपंग कल्याण राज्य पुरस्कारा‘ने गौरविण्यात आले.

बडोले म्हणाले, “”अपंगांनी अपंगांशी लग्न करणाऱ्यांना पन्नास हजार रुपये देण्याचा शासनाचा मानस आहे. संजय गांधी निराधार योजनेद्वारे देण्यात येणाऱ्या अर्थसाहाय्याची रक्‍कम सहाशे ऐवजी एक हजार रुपये करण्याचा शासनाचा विचार आहे. विशेष व्यक्तींना सर्वसामान्यांप्रमाणे जगता यावे. यासाठी काही योजना घेण्याचे शासनाने ठरविले.‘‘