41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ विज्ञानाला ईतका मान की वाढे आपल्या देशाची शान : इंजी. दयाल भोवते

विज्ञानाला ईतका मान की वाढे आपल्या देशाची शान : इंजी. दयाल भोवते

0
27

blank

लाखांदुर,दि.28 : आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. आज पृथ्वीतलावरील प्रत्येक व्यक्ती सकाळी ऊठल्यापासुन ते राञी झोपेपर्यंत विज्ञानातील नवनवीन शोधांचा स्वत:च्या दैनंदिन आयुष्यात वापर करीत आहे.विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की, आज मानवाने चंद्राला सुद्धा गवसणी घातली आहे. म्हणुनच विज्ञानाला एवढा मान की वाढे आपल्या देशाची शान असे मत इंजी. दयाल भोवते यांनी व्यक्त केले. ते लाखांदुर येथे आयोजीत राष्ट्रीय विज्ञान दिनी बोलत होते.
लाखांदुर येथील मिशन अधिकारी स्पर्धा परीक्षा केंद्र येथे दि. २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला .याप्रसंगी सर्वप्रथम भौतीकशास्ञातील नोबल पारीतोषीक विजेते डॉ. सी. व्ही. रमन  यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिपप्रज्वलीत करून विनम्र अभिवादन करण्यात आले.पुढे ते म्हणाले की,विज्ञानाच्या नवनविन शोधांमुळेच मानवी जीवनात प्रत्येक  गोष्टीला गती मिळाली . व्यक्तीचा राहणीमानाचा दर्जा ऊंचावला , जिवन जगने सोपे व सुकर झाले .याप्रसंगी उपाध्यक्ष म्हणुन लाभलेल्या शितल मेश्राम  यांनी डॉ. सी. व्ही. रमन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला . योबतच त्यांनी त्यांनी लावलेल्या अनेक शोधांचा ऊलगडा करत डॉ. रमन यांच्या कार्याला डोळ्यासमोर ठेवुन विद्यार्थ्यांनी सुद्धा नवनवीन शोध लावावेत व विज्ञानाप्रती आपले योगदान द्यावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन चंद्रसेन चामलाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौरभ बोरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता श्रीकांत लुटे , प्रविण रंगारी, अमित मेंढे, गौरव डोंगरे आकाश चौबे, शिवम रामटेके , प्रियंका मेंढे, सोनु बुरडे, किरण मेश्राम, काजल कोहाट, श्रद्धा टेंभुर्णे , प्रियंका भोवते , स्नेहल दिवठे, अंजली हुमणे  व अन्य  विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.

blank