25.2 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home महाराष्ट्र राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यास १५ मार्चपर्यंत मुदतवाढ

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यास १५ मार्चपर्यंत मुदतवाढ

0
34
वाशिम, दि. २८ : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. या पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यासाठी १५ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
इच्छुकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-३२) येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in  किंवा  www.maharashtra.gov.in  तसेच www.mahanews.gov.in  येथेही उपलब्ध आहेत.