24.1 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home शैक्षणिक १० वी बोर्ड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना मुलुंड शिवसेना विभागातर्फे शुभेच्छा

१० वी बोर्ड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना मुलुंड शिवसेना विभागातर्फे शुभेच्छा

0
47

मुलुंड,दि.02ःः शिवसेना मुलुंड विभागातर्फे मुलुंड येथील मुलुंड विद्यामंदिर शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ शालांत परीक्षा इयत्ता १०वी (SSC) च्या बोर्ड परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा तणाव मुक्त करण्यासाठी पाण्याची बाटली, चॉकलेट देवून शुभेच्छा देण्यात आल्या तसेच या विद्यार्थ्यांच्या पालकांकरीता ‘दहावी पॉकेट मंत्र’ या मार्गदर्शनपर पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमास वाणी विद्यालयचे जाधव सर, मुलुंड विद्यामंदिरच्या पवार मॅडम तसेच शिवसेना उपविभागप्रमुख सर्वश्री सुनिल गारे, महेंद्र वैती, विधानसभा कार्यालयप्रमुख सिताराम खांडेकर, विधानसभा संघटक नितीन सावंत, शिवसैनिक संजय माळी, नयन पेडणेकर, स्वप्निल सुर्यवंशी, संदेश मोढवे, प्रभाकर सोमासे, आकाश रोडे, राहुल वर्मा, प्रविण घडशी आणि अनेक शिवसैनिक, युवासेना व विद्यार्थीसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. ह्या वेळी सुमारे ३५० ते ४०० विद्यार्थ्यांना शिवसेना मुलुंड विभागातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन विष्णू धुरी सरांनी केले तर स्नेहा कॅटर्स यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पडला.