25.2 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ सातव्या दिवशी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मागे

सातव्या दिवशी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मागे

0
23

गोंदिया,दि.03ः- सडक अर्जुनी तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाती व झंकारगोंदी या गावांतील नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या त्वरीत मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा जुन्याच गावात जावून राहण्याचा इशारा देत आंदोलन सुरू केले होते. त्या आंगोलनाची दखल घेत मुबंई मंत्रालयात बैठक घेण्यात आली,त्यामध्ये तोडगा काढण्यात आले.त्यानंतरही आंदोलन सुरूच होते आज रविवारला माजी खासदार नाना पटोले़च्या उपस्थितीत वनविभाग व वन्यजिव प्रकल्प अधिकारी यांच्यासोबत प्रकल्पग्रस्तांची चर्चा झाली.त्यात बैठकीतील चर्चेची माहिती देण्यात आली.त्यावर पटोले़नी प्रकल्पग्रस्तांची बाजू घेत नियमानुसार रक्कम,प्रकल्पग्रस्ताचा दाखला व वापरासाठी शेतजमिनीवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आज आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी उपवनसरंक्षक युवराज,प्रकल्प संचालक रामानुजम व स्थानिक अधिकारी होते.

प्रशासनाला या गावातील पूर्वाश्रमीच्या श्रीरामपूरवासीयांनी देत गेल्या सहा दिवसांपासून जंगलातच आंदोलन सुरू केले होते त्या आंदोलकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी (दि.१) मुंबई येथे बोलविण्यात आली होती मात्र तिथे सुध्दा ठोस नव्हे तर तोंडी आश्वासन मिळाले.जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन दिले जात नाही,तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही असा पवित्राच आंदोलकांनी घेतला होता.मात्र आज रविवारला नाना पटोलेंच्या उपस्थितीत सरपंच भरत पंधरे,आंदोलक युवक किशोर शेंडे यांनी चर्चा करीत आंदोलन मागे घेतले.

मुंबई मंत्रालयात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्ताना मंजूर १० लाखापैकी उरलेली 1 लाख 64 हजाराची रक्कम देण्याचे मंजुर करण्यात आले.तसेच स्थानिक पातळीवरील समस्यांचे निराकरण करण्याचे ठरविण्यात आले.मात्र प्रकल्पग्रस्तांना दाखला देण्याच्या मुद्द्यावर एकमत झाले . जिल्हा परिषद शाळेच्या नावात बदल करणे, गाव वसाहत 9.30 हेक्टर जमीन श्रीरामनगर च्या नावे मंजूर करणे, पुनर्वसित नागरिकांच्या नावे घर पट्टे देण्यास मंजुरी देण्यात आली.यापुर्वी याठिकानी सरकार नाव होते ते आता प्रकल्पग्रस्त कुटूबांचे नाव करण्यात येणार आहे. बैठकीला वनविभागाचे प्रधानसचिव विकास खरगे, वनविभागाचे अधिकारी सुनील इलमकर, संजय डोडल, स्वप्नील देशकर,गोंदियाचे उपवनसंरक्षक एस .युवराज,दिव्या भारती,श्रीरामपूरचे सरपंच भरत पंधरे, प्रकाश रहिले, जागेश्वर चांदेवार आदीं उपस्थित होते.