25.1 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण

गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण

0
32

सडक अर्जुनी,दि.05 : तालुक्यातील चिचटोला येथे तथागत गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री राजकुमार बडोले यांचा हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे, डॉ.अजय लांजेवार, पुज्य भंते, डॉ.धम्मदीप महाथैरो,जि.प.सदस्य शिला चव्हाण, पं. स. उपसभापती राजेश कठाणे, माजी पं. स.
सभापती कविता रंगारी, पं.स.सदस्य सुधाकर पंधरे, प्रकाश बन्सोड, तालुका भाजपा महिला अध्यक्ष पदमा परतेकी, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी व मान्यवरांनी आपले
मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.

blank