24.8 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home Featured News भांडूप येथे अभिनय कार्यशाळा उत्साहात

भांडूप येथे अभिनय कार्यशाळा उत्साहात

0
44

शेखर भोसले/मुलुंड पूर्व,दि.20ः– भांडूप येथील कलाघर The Artist Home मध्ये रविवारला(दि.१७) अभिनय तंत्रमंत्र ह्या विषयावर ज्येष्ठ लेखक, नाटककार प्रकाश देसाई यांची कार्यशाळा उत्साहात पार पडली.कार्यशाळेत प्रशिणार्थ्यांना अभिनयाचे प्रशिक्षण देण्यात आले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यशाळेचा लाभ १० ते ६५ वयोगटातील कलारसिकांनी घेतला.या कार्यशाळेचे आयोजन कलाघर कला अकादमी, भांडुप ह्यांच्या वतीने करण्यात आले होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रणय शेट्ये,विश्राम चव्हाण व कलाघरच्या इतर कलावंतांनी परिश्रम घेतले.

 

blank