ऍनिमिया मुक्त शहर निमित्ताने विविध विषयावर जनजागृती

0
5

देसाईगंज,दि.20:-(ता.प्र) ग्रामीण रुग्णालय देसाईगंज च्या वतीने रुग्णालय च्या सभागृहात ऍनिमिया मुक्त शहर निमित्ताने विविध विषयावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी ग्रामीण रुग्णालय देसाईगंज चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इकबाल बेग,वैद्यकीय अधिकारी डॉ.कु नाकाडे,सिस्टर इन्चार्ज मेरी विल्सन,अधीक्षक श्रीमती कापकर,लॅब टेकनीशियन लोहारे,आरोग्य सेविका चिलमवार,सचिन ब्रदर उपस्थित होते.सध्या स्थिती मध्ये महिलांना ऍनिमिया असल्या मुळे महिलांना कोणते कोणते आजाराला समोर जावे लागते, महिलांना पूर्णपणे जीवन जगण्याचा अधिकार आहे का किती महिलांना अत्याचारला समोर जावे लागत आहे किती महिला सक्षम आहेत यावर उपस्थिती अतिथीनी मार्गदर्शन केले.
कुष्ठरोग लक्षणें निदान व उपचार कुष्ठरुग्ण यांना ग्रामीण रुग्णालय मध्ये दिल्या जात असलेल्या सेवा संदर्भात कुष्ठरोग तंत्रज्ञ दिनकर संदोकर यांनी मार्गदर्शन केले सोबत क्षयरोग ची लक्षणें निदान उपचार या संदर्भात कु स्मिता डोंगरे,महिलांना तंबाखू खरा नस असे विविध व्यसन असल्यामुळे त्याना कर्करोग आजार होऊ शकते यासंदर्भात समुपदेशक कु तारकेस्वारी कांबळे,मासिक पाळी दरम्यान घ्यावंयाची काळजी व आहार या संदर्भात समुपदेशन कु वनिता आधावू यांनी केले.कार्यक्रमाला रुग्णालय मधील रुग्ण, आरोग्य कर्मचारी तसेच शहरातील बहुसंख्य महिला उपस्थित होते.