24.2 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home मराठवाडा/खान्देश लोकसभा निवडणूकीच्या पाशर्वभूमीवर संख मध्ये पोलिसांचे संचलन

लोकसभा निवडणूकीच्या पाशर्वभूमीवर संख मध्ये पोलिसांचे संचलन

0
31

संख(राजेभक्षर जमादार),दि.31ः- सांगली लोकसभा निवडणूकीच्या पाशर्वभूमीवर कायदा – सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शनिवारला(दि.30) संख येथे उमदी पोलिसांनी संचलन केले.उमदी पोलीस ठाण्याचे सा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्या मार्गदर्शनखाली सुमारे ३५ कर्मचाऱ्यांनी संचलनात सहभाग घेतला.शिवाजी चौक ,जुने बस शेड ,अबेंडकर चौक,बसवेश्वर चौकमार्गे स्टॕडजवळ या पथ संचलनाचा समारोप झाला.अचानक आलेल्या पोलिसांचा ताफा बघून नागरीकांना धडक भरली.गावातील अवैध धंदेचालकांनी धुम ठोकली.काही वेळानंतर हे लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीव पोलीसाचे संचलन असल्याचे समोर आल्याने अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला.या संचलनमध्ये सा.पोलीस निरीक्षक कोळेकर ,सा.पोलीस उपनिरीक्षक प्रवीण संपागे ,सा.पोलीस उपनिरीक्षक दांडगे सह कर्मचारी सहभाग झाले होते.

blank