23.7 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home मराठवाडा/खान्देश ४० तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ

४० तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ

0
7
परभणी, दि.9 : मुख्य मध्यस्थी देखरेख समिती, मुंबई उच्च न्यायालयांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ४० तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष (जिल्हा विधी सेवा प्राधिकरण) आर. एम. सादराणी यांच्या हस्ते करण्यात आले.
न्या. आर.एम.सादराणी यावेळी बोलताना म्हणाले की, मध्यस्थी ही केवळ वाद मिटवण्याची प्रक्रिया नसून दोन पक्षांमध्ये संवाद, समन्वय आणि सौहार्द निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम आहे. न्यायालयीन प्रक्रियेला पर्याय म्हणून नव्हे तर न्याय अधिक जलद, सुलभ आणि समाधानकारक पद्धतीने भेटून देणारी व्यवस्था म्हणून मध्यस्थीकडे पाहणे गरजेचे आहे.
याप्रसंगी एमसीपीसी, नवी दिल्ली येथील वरिष्ठ प्रशिक्षक तथा सिटी सिविल जज व प्रशासकीय न्यायाधीश संजीव भालेराव व एम.के.जाधव, अध्यक्ष, एस.टी.अडकिने, अध्यक्ष जिल्हा वकील संघ परभणी तसेच भूषण काळे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिनांक ८ ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ४० तासाचे मध्यस्थी प्रशिक्षण कार्यक्रमात परभणी व अंतर्गत येणाऱ्या सर्व तालुक्यातील ४० वकील मंडळी यांनी सहभाग नोंदवला आहे.
मध्यस्थी प्रक्रियेबाबत सखोल प्रशिक्षण या कार्यशाळेत दिले जाणार आहे. सूत्रसंचालन एडवोकेट युसुफझाईन नहीन यांनी केले. तर आभार प्रदर्शन ॲड. रासवे यांनी केले.प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. एम.सादरानी, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सचिव, भूषण काळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
blank