29.1 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ दांडेगाव येथे तेली समाज मेळावा उत्साहात साजरा

दांडेगाव येथे तेली समाज मेळावा उत्साहात साजरा

0
49

गोंदिया,दि.02 : संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त गोंदिया जिल्हा तेली समाजसंघटनेच्यावतीने तालुक्यातील दांडेगाव येथे तेली समाजबांधव मेळाव्याचे आयजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णराव हिंगणकर होते.तर उदघाटक म्हणुन तुमसर नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे हे उपस्थित होते.पाहुणे म्हणून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे,तुमसरचे आमदार चरण वाघमारे,उपसरपंच हिरामण बावनकर,महिला बँकेच्या अध्यक्षा डॉ. माधुरी नासरे,उमेंद्र भेलावे,महिला आघाडी अध्यक्षा जयाताई धावडे,संतोष खोब्रागडे,राजु मदानकर, श्यामराव ठोंबरे आदि मान्यवर उपस्थित होते. संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेच्या दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी,समाजातील गरीब विद्याथ्र्यांसाठी आपण सदैव मदतीचा हात दिला आहे.आणिस्व. अंजनाबाई चॅरिटेबल टड्ढस्टच्या माध्यमातून सामान्य कुटुंबातील विद्याथ्र्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून निशुल्क कोचिंग क्लासेस सुरु असल्याचे सांगितले.यापुढेही आपल्या क्षेत्रातील व समाजातील गरीब विद्यार्थी वर्ग दहावी व बारावी वर्गात ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाले असतील परंतु घरची परिस्थिती हलाखीची असेल अशावेळी पुढील शिक्षण घेण्यासाठी समाजाचा घटक म्हणून सहकार्याची ग्वाही दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले.

blank