29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News धमतरीत सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 1 जवान शहीद

धमतरीत सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 1 जवान शहीद

0
34
file photo

blank

रायपूर(वृत्तसंस्था),दि.5 -छत्तीसगड राज्यातील काँकेर भागात गुरुवारपासून नक्षल्यांनी उन्माद माजविला असून सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज शुक्रवारी (दि.5) पहाटे चकमक झाली आहे. या चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. धमतरी जिल्ह्यातील सालेभाट जंगलात ही चकमक झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. या चकमकीत एक जवान शहीद झाल्याचे वृत्त असून शहीद जवानाचे नाव हरीश चंद्र असे आहे.सीआरपीएफ 211 बटालियनमध्ये प्रधान आरक्षक पदावर होते.ते मध्यप्रदेशातील भोपाल निवासी आहेत.

 

blank