27.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ जयदीप कवाडेवर गून्हा दाखल करा;महिला मोर्च्याची तक्रार

जयदीप कवाडेवर गून्हा दाखल करा;महिला मोर्च्याची तक्रार

0
39
गोंदिया,दि.६ एप्रिलः- नागपूर मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवाराच्या जाहीर सभेत विधान परिषद सदस्य जोगेंद्र कवाडे यांचे पूत्र जयदीप कवाडे यांनी भाजपा नेत्या स्मृती इरानी यांच्यासाठी अश्लिल व लज्जास्पद भाषेचा उपयोग करुन महिलांची बदनामी केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भाची तक्रार भाजपा महिला आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षकांना करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, नागपूरच्या सभेत जगदीप कवाडे यांची विधाने ही केवळ एका महिलेसंदर्भात नसून समस्त महिला वर्गाचा अपमान करणारी आहे. अशा प्रवृत्तींवर वचक राहावा, यासाठी जगदीश कवाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महिला मोर्चा व समस्त महिला वर्गाकडून होत आहे. अतिरिक्त पोलिस अधिकारी सोनाली कदम यांना निवेदन देण्यात आले.