28.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home Top News लोकसभेच्या 91 जागांसाठी मतदान सुरू

लोकसभेच्या 91 जागांसाठी मतदान सुरू

0
31

गोंदिया,दि.11 – लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे. त्यामुळे, मतदारांनी अपना टाईम आ गया असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. कारण, देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी आज मतदानाचा हक्क बजावण्यास सुरवात केली आहे. 17 व्या  लोकसभेच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी देशाच्या विविध राज्यातील 91 मतदारसंघात आज सकाळी 7 वाजेपासून मतदांनाला सुरवात झाली आहे.नागपूर येथे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदान केले आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र जैन यानी सप्तनीक मतदान करुन मतदानाला सुरवात केली आहे.

विदर्भातील 7 जागासांठी मतदानाला सुरवात झाली असून अद्याप कुठूनही गोंधळाची स्थिती समोर आलेली नाही.