29.6 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home मराठवाडा/खान्देश निवडणुक कामासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बसला अपघात

निवडणुक कामासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बसला अपघात

0
44

बीड,दि.17ः- लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी होत आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. आज मतदान केंद्रावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बसचा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये ५० कर्मचारी होते. कर्मचाऱ्यांना घेऊनजाणारी बस रस्त्याच्या खाली गेली, मात्र बस उलटली नाही त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. ही घटना आज (बुधवार) दुपारी दोनच्या सुमारास आष्टी तालुक्यातील डोईठाणा परिसरात घडली.च्या ठिकाणी मुक्कमी जात आहेत. असेच काही कर्मचारी आष्टी येथून बसने (एमएच २० बीएल २६८५) मतदान केंद्रावर जाण्यासाठी बसमध्ये बसले होते. डोईठाणा जवळ पाण्याचे टँकर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर अचानक बसला आडवा आला. त्यामुळे बस चालकाने बस रस्त्याच्या खाली घातली. बस बाजूच्या खड्ड्यात गेली, सुदैवाने बस पलटी न झाल्याने बासमधील जवळपास ५० अधिकारी, कर्मचारी बालबाल बचावले. या घटनेत काहीजणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घटनास्थळीच सोडून पळून गेला.अपघातग्रस्त बस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विद्यूत खांबाला धडकली. यावेळी विद्यूत प्रवाह सरु होता. बस धडकल्याने स्पार्किंग झाली. सुदैवाने तार तुटली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.