30.1 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ ‘मअंनिस’ची जिल्हा कार्यकारिणी गठित

‘मअंनिस’ची जिल्हा कार्यकारिणी गठित

0
19

भंडारा,दि.20ः- महाराष्ट्र अंधर्शद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांच्या अध्यक्षतेत भंडारा जिल्हा मअंनिसची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष हर्षल मेश्राम, उपाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, कार्याध्यक्ष विष्णूदास लोणारे, प्रधान सचिव कन्हैय्या नागपुरे, कायदेविषयक सल्लागार अँड. संजीव गजभिये, अँड. राजेंद्र रंगारी, संदिप मारबते, विविध उपक्रम कार्यवाह डॉ. विश्‍वजित थुलकर, सहकार्यवाह ज्ञानेश्‍वर निकुरे, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प प्रा. युवराज खोब्रागडे, बुवाबाजी संघर्षकार्यवाह डॉ. प्रविण थुलकर, सहकार्यवाह डॉ. नरहरी नागलवाडे, वार्तापत्र कार्यवाह विलास सुदामे, सहकार्यवाह सुधीर लोणारे, सांस्कृतिक अभिव्यक्ती कार्यवाह प्रकाश नाकतोडे, विलास साकोरे, प्रकाशन व वितरण मेहमुद अली वायब अली, युवा सहभाग कार्यवाह कविता लोणारे, सहकार्यवाह निर्जला पारधी, प्रशिक्षण विभाग कार्यवाह प्रा. नरेश आंबिलकर, सहकार्यवाह बासप्पा फाये, निधी संकलन कार्यवाह छाया गजभिये, मकबुल वारशी, मानसिक आरोग्य विभाग कार्यवाह डॉ. वंदना मोटघरे, निश्‍चित मेर्शाम, सोशल मिडीया व्यवस्थापन गणेश निमजे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी लक्ष्मीकांत मल्लानी, केशवराव बिसने, प्रतिमा बघेले, मोती राणे, जितेंद्र रामटेके उपस्थित होते.