37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home राजकीय निरुपम यांनी दाखविले मोदींना काळे झेंडे

निरुपम यांनी दाखविले मोदींना काळे झेंडे

0
14

blank

मुंबई दि.2- पंतप्रधान नरेंद्र मोदींना काळे झेडें दाखवल्याप्रकऱणी मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम आणि पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.
मंत्रालयाजवळील कूपरेज मैदानातील आंबेडकर पुतळ्याजवळ निरुपम आणि पक्ष कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले.
आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र अहमदाबाद येथे हलवण्यात आल्याने मुंबईवर अन्याय झाला तसेच एपील कार्डाद्वारे नागरिकांनी धान्य पुरवणे बंद करावे यासाठी त्यांनी जोरदार आंदोलन केले. तसेच केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याविरोधातही निरुपम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.दरम्यान, यावेळी पोलिसांनी निरुपम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि दोन तासांनंतर त्यांची सुटकाही केली.

blank