29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home महाराष्ट्र ‘जय महाराष्ट्र’ मध्ये ‘हिवरेबाजार : समृध्द गाव’

‘जय महाराष्ट्र’ मध्ये ‘हिवरेबाजार : समृध्द गाव’

0
37

मुंबई, दि. ३० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र कार्यक्रमात ‘हिवरेबाजार समृध्द गाव’ या विषयावर हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांची विशेष मुलाखत  घेण्यात आली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग शुक्रवार दिनांक ३१ मे रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी ७. ३० वाजता प्रसारित होणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे  संचालक अजय अंबेकर यांनी  ही मुलाखत घेतली आहे.
 अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील आधीचे आणि आताचे हिवरेबाजार, गावात गेल्या तीस वर्षात झालेले बदल, ग्रामविकासाचा आराखडा, विकास योजना राबविण्यासाठी‍ गावकऱ्यांचे केलेले मतपरिवर्तन, गावच्या विकासाकरिता मिळालेली प्रेरणा, गावात मे  महिन्यातही पाण्याची कमतरता जाणवत नाही त्याची कारणे आदी विषयांची सविस्तर माहिती श्री.पवार यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.

blank