43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय शरद पवारांची शपथविधी सोहळ्याला गैरहजेरी

शरद पवारांची शपथविधी सोहळ्याला गैरहजेरी

0
46

blank

 
मुंबई – केंद्रातील नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यात देश-विदेशातील महत्त्वाचे पाहुणे उपस्थित झाले असताना देशातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे मात्र या सोहळ्याला गैरहजर राहिले. पवार यांना शपथविधी सोहळ्यात नियोजित शिष्टाचारानुसार (प्रोटोकॉल) बसण्याची जागा दिली गेली नाही. याच कारणामुळे नाराज झालेल्या पवार यांनी सोहळ्यात उपस्थित राहायचे नाही, असे ठरवल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते असून त्यांनी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे. अशा नेत्याला अशी वागणूक मिळणे चुकीचे असल्याचे पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. पवार यांना सोहळ्यात देण्यात आलेली बसण्याची जागा ही प्रोटोकॉलनुसार नाही हे पक्षाच्या लक्षात आले. याच कारणामुळे पवार सोहळ्यात उपस्थित राहिले नाहीत, असे मलिक यांनी सांगितले. 

blank