28.9 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home महाराष्ट्र समाजातील आर्थिक कमजोर विद्याथ्र्यासांठी शिक्षा निधीचे गठण

समाजातील आर्थिक कमजोर विद्याथ्र्यासांठी शिक्षा निधीचे गठण

0
30

गाव ते जिल्हापातळीवर महासभेचे संघटन निर्मितीवर भर
पवार क्षत्रिय महासभेच्या कार्यकारिणीचा निर्णय
नागपूर,दि.२6-राष्ट्रीय क्षत्रिय पवार महासभेच्या येथील पवार विद्यार्थी भवन कुकडे ले आउट येथे २३ जून रोजी पार पडलेल्या कार्यकारिणी बैठकीत समाजातील गुणवंत परंतु आर्थिक परिस्थितीने कमजोर असलेल्या विद्याथ्र्यांना चांगले शिक्षण उपलब्ध व्हावे या उद्देशाने पहिल्यांदाच शिक्षा निधी(शिक्षा कोष)निर्माण करण्यास सर्वसम्मतीने मंजुरी देण्यात आली.तसेच महासभेचे माहिती समाजातील तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी गाव ते जिल्हापातळीवर संघटन निर्माण करण्यावर चर्चा करून विविध विषयांना मंजुरी देण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजि.मुरलीधर टेंभरे होते.यावेळी संरक्षक माजी अध्यक्ष इंजि.टी.डी.बिसेन,डॉ.एन.डी.राऊत,महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेश देशमुख,राजेंद्रप्रसाद पटले,मोतीलाल चौधरी,एड.किरणलता चोपडे,अशोक बिसेन राष्ट्रीय संघटन सचिव खेमेंद्र कटरे,कोशाध्यक्ष रमेश टेंभरे,सहकोषाध्यक्ष दिलीप रहागंडाले,जनसंवाद सचिव सुनील गौतम,इंजि.सुखदेव पारधी,युवा अध्यक्ष प्रल्हाद पटले,सहसचिव सुरेश देशमुख,मनोज भैरम,जितेंद्र बिसेन यांच्यासह सदस्य अर्पण बिसेन(इंदोर),जगदीशचंद्र पवार(बैतुल)एड.रुपेंद्र कटरे,जगदीश येडे,मनोज चव्हाण, नेपालसिंह तुरकर,विद्या बिसेन,देवेंद्र चौधरी,लेखसिंह राणा,मनमोहन रहागंडाले,लिखेंद्र बिसेन,श्रावण फरकाडे,श्री.टेंभरे आदी मान्यवरांसह बैतुल,भंडारा,नागपूर,हिंगणा,भिलाई,रायपूर,बालाघाट,तुमसर,रामटेक,छिंदवाडा,गोंदिया,तिरोडा येथील पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीची सुरवात चक्रवर्ती राजाभोज व गडकालिका माता यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.या बैठकीत महासभेच्या ११३ वर्षाच्या सामाजिक कार्याची माहिती देण्यात आली.तसेच ज्याप्रमाणात महासभा गावपातळीवर समाजबांधवापर्यंत पोचायला हवी होती,त्यापध्दतीने न पोचल्यामुळे ज्याठिकाणी जिल्हास्तरावर संघटन नाही तिथे नवे संघटन तयार करून तसेच जिथे आधीपासून समाजाचे संघटन आहे.त्या संघटनेला महासभेशी संलग्नीकरण करून त्यांच्यामाध्यमातून महासभा गाव ते जिल्हापातळीवर पोचविण्यावर चर्चा करण्यात आली.यात सदस्यांनी सुचविलेल्या सूचनांचेही स्वागत करण्यात आले.तसेच पाच वर्षात मध्यप्रदेश,महाराष्ट्र व छत्तीसगडमधील पोवार बहुल जिल्ह्यात दरवर्षी एक अधिवेशन(आमसभा)घेण्यासंबंधी चर्चा करण्यात आली.यावर्षीची पहिली आमसभा(अधिवेशन)मध्यप्रदेशातील बैहर येथे घेण्याचे ठरविण्यात आले.देशातील ज्या ज्या राज्यात पवार संघटन आहेत त्या सर्व संघटनांना राष्ट्रीय पवार महासभेसोबत जोडण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच त्या संघटनांकडून एका पंचवार्षिक कार्यकाळाकरीता १००० रुपये संलग्नीकरण शुल्क घेण्यावर एकमत झाले.समाजातील सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात एकरूपता ठेवण्यासाठी सामाजिक नियम तसेच लग्नसमारंभातील प्री. वेqडग कोरीओग्रापीवर आळा घालण्यासंबधी चर्चा करण्यात आली.राजाभोज जयंतीचे आयोजन बसंतपंचमीपासून १० दिवसाच्या आत करण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला.तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमात सम्राट विक्रमादित्य व राजाभोज यांचे जीवनचरित्र समाविष्ट करण्यासोबतच डाकतिकीट काढण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.पवार समाजातील अन्य शाखांसोबत समन्वय स्थापन करणे तसेच राजपूर पवार शाखेसोबत समन्वय स्थापन करण्यावर चर्चा करण्यात आली.बैठकीत पवार,पोवार समाज हा ओबीसी प्रवर्गात येत असल्याने या प्रवर्गातील सर्व योजनांचा लाभ विद्याथ्र्यांना मिळावा यासाठी ओबीसी योजनांची माहिती देण्यात आली.तसेच मध्यप्रदेश,छत्तीसगडमधून महाराष्ट्रात आलेल्या समाजातील बांधवांना जातप्रमाणपत्र व क्रिमीलेअर बनविताना ज्या अडचणी येत आहेत,त्यासंबंधी केंद्र व राज्यसरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीचे संचालन संघटन सचिव खेमेंद्र कटरे यांनी केले,तर आभार उपाध्यक्ष मोतीलाल चौधरी यांनी मानले.

blank