गोंदिया,दि.२६.: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा २६ जून हा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, गोंदिया आणि पहांदीपारी कुपार लिंगो बहुउद्देशीय संस्था, खर्रा, ता.जि.गोंदिया यांच्या संयुक्त वतीने आज २६ जून रोजी सकाळी ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन गोंदिया येथे अनाथ व मागासवर्गीय समाजातील युवक-युवतींचा सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी आणि अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.
या सामुहिक विवाह सोहळ्यात एकता मेश्राम- बादल गजभिये, मु.पो. आसोली, ता.जि. गोंदिया, काजोल पाथरे-आकाश कांबळे, मु.पो. कुडवा, कविता कांबळे-राकेश पाथरे, मु. पो. कुडवा, शिल्पा बिसेन-समीर शेंडे, मु.पो. कुडवा, ज्योती ठाकरे-दिपक राऊत, मु.पो. कोहलगाव, ममिता कोल्हे-भोजराज मेश्राम, आचल बनसोड-निखील बोरकर, भुमेश्वरी कागदीमेश्राम- जितेंद्र सिंधीमेश्राम, आरती घोरमारे-दिनेश उईके, किरण कांबळे-मंगेश कोल्हे, स्वाती ठवरे-शैलेश गजभिये, वनिता सोनवाणे-राजकुमार लांजेवार, योगीता कांबळे-प्रेमचंद शेंडे, करिश्मा शेंडे-कमलेश सतीमेश्राम, प्रतिभा मेघनाथेमेश्राम-सतिश कागदीमेश्राम, जयश्री मेश्राम-गौतम रामटेके, प्रतिभा राऊत-नरेश मलये, सुप्रिया गजभिये-धम्मदिप मेश्राम हे अनाथ व मागासर्वीय युवक-युवती विवाहबध्द होणार आहे. तरी नवदाम्पत्यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरीकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन समाजकल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे व संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सविता बेदरकर यांनी केले आहे.





