23.7 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home शैक्षणिक आंतरराष्ट्रीय शाळा हिरडामाली व माॅडेल कान्व्हेंटमध्ये नवागताचे स्वागत

आंतरराष्ट्रीय शाळा हिरडामाली व माॅडेल कान्व्हेंटमध्ये नवागताचे स्वागत

0
42

गोरेगाव,दि.27ः- तालुक्यातील हिरडामाली येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेत सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून शाळेत नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, चाॅकलेट व फुगे देऊन आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत हिरडामालीच्या सरपंच रंजनाताई बरयेकर तर प्रमुख उपस्थितीत ग्राम पंचायतचे उपसरपंच तथा सदस्य शाळा व्यवस्थापन समिती तेजलालजी पटले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राखीलाल येळे, सदस्य चंद्रसेन पटले,सदस्य प्रा.लोकेश कटरे,सदस्या वंदना ठाकूर,उषा राऊत,नंदेश्वरा राऊत,ग्रा.सदस्य सुजित हरिणखेडे,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे तज्ञ मारवाडे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सभासद, ग्राम पंचायतचे सर्व सभासद उपस्थित होते.प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक एस. डी. चन्ने यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन पदविधर शिक्षिका नानन बिसेन यांनी तर आभार स.शि.अजय तितिरमारे यांनी मानले.गोड जेवनानी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता पदविधर शिक्षक सुरेश बघेले स.शि.सौ.छाया पारधी, स.शि. विरेंद्रकुमार पटले,स.शि.कु.साधना पारधी,कान्वेंट शिक्षिका सविता पटले, एकता कटरे, मनिषा हरीणखेडे यांनी अथक परिश्रम घेतले.

गोरेगावः-स्थानीय मॉडेल कॉन्व्हेंट एण्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव मध्ये शाळेच्या पहिल्यादिवशी राजर्षी शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला . कार्यक्रम शाळेचे संस्थापक आर.डी.कटरे, प्राचार्य छाया पी.मेश्राम, सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते शाळेत प्रवेशित झालेल्या सर्व नवीन विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा पुष्पगुच्च देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक वृंद व इतर कर्मचारी तसेच सर्व विध्यार्थी उपस्थित होते. शाळेचे संस्थापक आर.डी.कटरे यांनी शाळेच्या पहिल्या दिवसावर विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

blank