भाषण करताना सुप्रिया सुळे स्टेजवरच पडल्या

0
18

तासगाव – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे भाषण करताना चक्कर येऊन स्टेजवरच कोसळल्या. तासगाव येथील पोट निवडणूकीच्या प्रचार सभेत ही घटना घडली आहे. तीव्र उष्णतेमुळे त्यांना भोवळ आली असावी, असा अंदाज सभेसाठी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला आहे.
माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. येथे राष्ट्रवादीने आर आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी मंगळवारी खासदार सुप्रिया सुळे तासगावमध्ये आल्या. त्या भाषण करत असतानी त्यांना चक्कर आली आणि खाली कोसळल्या. तेव्हाच डायस देखील खाली पडला.
कार्यकर्ते आणि उमेदवार सुमन पाटील यांनी त्यांना लागलीच उठवून बसवले. पाणी पिण्याचा अग्रह केला, मात्र त्यांनी पाणी पिण्यास नकार दिला. त्या परत उभ्या राहिल्या आणि आपल्याला बरे वाटत नसल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. सभेच्या ठिकाणी लागलीच अॅम्बुलन्स दाखल झाली. आता त्यांची प्रकृती ठिक आहे.
तासगाव हा दुष्काळी भाग आहे. त्यातच उन्हाची तीव्रता गेल्या काही दिवसांमध्ये वाढली आहे. सुमन पाटील यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे मॅरेथॉन सभा घेत आहेत. दिवसभर उन्हात फिरत असल्यामुळे त्यांना चक्कर आली असावी असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. तासगाव पोट निवडणुकीसाठी 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे