८ ते १४ एप्रिल रोजी सामाजिक समता सप्ताह

0
19

गोंदिया, दि.७ : अनुसूचित जाती, जमाती, वंचित दुर्बल घटकांना न्याय व आर्थिक, सामाजिक संरक्षण उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. या कल्याणकारी योजनेअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ८ ते १४ एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये ८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सामाजिक न्याय भवन येथे सप्ताहाचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मान्यवर उपस्थित राहतील. ९ एप्रिल ह्न सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेल्या सर्व महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेच्या लाभार्थ्यांना कर्जवाटप करणे. १० एप्रिल – शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांची एकदिवसीय कार्यशाळा. ११ एप्रिल – जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करणे व विविध सामाजिक संघटनांच्या सहाय्याने व्यसनमुक्तीचा प्रचार व प्रसार करणे. १२ एप्रिल – अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमधून स्वच्छता अभियान राबविणे. १३ एप्रिल -सामाजिक कार्यक्षेत्रातील विचारवंत यांचे प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करणे आणि १४ एप्रिल -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय कार्यालयामध्ये प्रतिमेस अभिवादन करणे तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख कार्यक्रमाचे आयोजन करुन सप्ताहाचा समारोप करणे. आदी कार्यक्रम या सप्ताहादरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी दिली.