हवाई वाहतूक मंत्री – ‘विमानात माचिस घेऊन जाण्यात कसला आला धोका,

0
10

वृत्तसंस्था
नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये वादग्रस्त विधान करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री गजपती राजू यांनी मंगळवारी वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले, विमान प्रवासात माझ्याकडे नेहमीच काडीपेटी किंवा लायटर असते. मंत्री असल्याने माझी कोणी चौकशीही करत नाही, आणि मला आठवत नाही, की जगात माचिस सोबत बाळगल्यामुळे एखाद्या विमानाला धोका झाला आहे.

केंद्रीय मंत्री राजू यांनी विमानात माचिस नेण्याला असलेल्या बंदीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले,’काडीपेटी धोकादायक कशी काय असू शकते. काडीपेटीने काही विमान हायजॅक थोडीच करता येते?’ काडीपेटीने विमानाला धोका झाला अशी एकही घटना जगात घडल्याचे मला ऐकिवात नाही.
विमान प्रवासात ज्वलनशील पदार्थ सोबत बाळगण्यास बंदी आहे. असे असतानाही मंत्री महोदय सर्रास माचिस किंवा लायटर सोबत घेऊन जात असल्याचे स्वतःच सांगत होते. आपण काय बोलत आहोत याचे भान देखील त्यांना नव्हते, आणि जेव्हा ते कळाले तेव्हा वेळ निघून गेलेली होती.