25.8 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home मराठवाडा/खान्देश आम्ही लेखिका औरंगाबादच्या अध्यक्षपदी माधुरी चौधरी

आम्ही लेखिका औरंगाबादच्या अध्यक्षपदी माधुरी चौधरी

0
37

औरगांबाद,दि.16ः- 2020 च्या दिवाळी मध्ये फक्त महिलांसाठी आयोजित विश्व साहित्य संमेलनाची तयारी गेल्या दोन वर्षांपासून सुरु असून मोहन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जिल्ह्यांमध्ये लेखिकांची कार्यकारिणी गठित करण्यात येत आहेत.त्याअनुषंगाने औरंगाबाद मध्ये माधवी देवळाणकर यांच्या घरी झालेल्या सभेत आम्ही लेखिका औरंगाबादच्या अध्यक्षपदी  माधुरी चौधरी यांची निवड करण्यात आली.तसेच उपाध्यक्ष  माधवी देवळाणकर,कार्याध्यक्ष वर्षा कल्याणकर,कार्यवाहक मृणाल देशपांडे,कोषाध्यक्ष ज्योत्स्ना राऊत,निमंत्रक मंगला चौरे,संचालक  अलका कुलकर्णी,रसिका देशमुख व माधुरी पंराजपे यांचा समावेश करण्यात आला.तसेच पुढिल नियोजनाकरीता  २२ जुलैला सायकांळी ५ वाजता वर्षा कल्याणकर यांच्या निवासस्थानी  बैठक आयोजित करण्यात आली असून ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी माधुरी चौधरी यांच्याशी 9421860873 संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले आहे.