34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ राष्ट्रवादी काँग्रेस व्हीजेएनटी आघाडी जिल्हाध्यक्षपदी मांढरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्हीजेएनटी आघाडी जिल्हाध्यक्षपदी मांढरे

0
26

blank

गोंदिया,दि.24ः- गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्हीजेएनटी आघाडीच्या अध्यक्षपदी उमराव मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मांढरे यांची नियुक्ती व्हीजेएनटी राष्ट्रवादी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष हिरालाल राठोड यांनी केली आहे.नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात मांढरे यांना निवड पत्र देण्यात आले.यावेळी आमदार प्रकाश गजभिये,विदर्भ अध्यक्ष राजेंद्र बढिये,नागपूर महिला शहर अध्यक्ष अल्का कांबळे आदी उपस्थित होते.मांढरे यांच्या निवडीबद्दल गोंदिया जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

blank