27 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ धोटे सूतिका गृहाच्या इमारतीचे आज भूमिपूजन

धोटे सूतिका गृहाच्या इमारतीचे आज भूमिपूजन

0
42

गोंदिया,दि.११: शहरातील रेलटोली परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या धोटे सुतिका गृहाला अच्छे दिन येणार आहेत. नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांच्या अथक प्रयत्नातून हे रुग्णालय पुन्हा नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्याकरिता वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून इमारत बांधकामाकरिता ४ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन उद्या रविवारी(दि.११) सकाळी ११ वाजता पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे राहणार आहेत. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, संघटन महामंत्री बाळा अंजनकर, माजी आमदार रमेश कुथे, माजी जि. प. अध्यक्ष नेतराम कटरे, प्रदेश सदस्य विनोद अग्रवाल, शहर अध्यक्ष सुनील केलनका, नगर पालिकेचे माजी अध्यक्ष कशिश जायस्वाल, गटनेते घनशाम पानतवने, उपाध्यक्ष शिव शर्मा, सभापती नितू बिरीया, मोसमी सोनछात्रा, वर्षा खरोले यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बांधकाम सभापती धर्मेश अग्रवाल, नगरसेवक सचिन शेंडे, रत्नमाला साहू यांनी केले आहे.