25 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ संतक्रांती यात्रा व पादुका दर्शन पालखीचे बोंडगाव देवी येथे उत्स्फूर्त स्वागत

संतक्रांती यात्रा व पादुका दर्शन पालखीचे बोंडगाव देवी येथे उत्स्फूर्त स्वागत

0
26

अर्जुनी मोर,(संतोष रोकडे),दि.26ः अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी द्वारा आयोजित गुरुदेव क्रांतिज्योत यात्रा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पादुका दर्शन पालखीचे 24 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता दिघोरी मोठी वरून मातोश्री रमाई आंबेडकर चौक बोंडगाव देवी येथे आगमन होताच गुरुदेव सेवा मंडळ च्यावतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले
पादुका दर्शन पालखीचे माजी खासदार नानाभाऊ पटोले बोंडगाव देवी सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्य कमलताई पाऊलझगडे सरपंच राधेश्याम झोडे तालुका सेवाधिकारी दादा फुंडे तालुका प्रचारक रत्नाकर बोरकर हभप दुर्योधन मैंद जिल्हा सेवाधिकारी मुन्नालाल ठाकूर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे खांबी चे सरपंच प्रकाश शिवणकर प्रमोद पाऊलझगडे कृष्णकांत खोटेले पुरुषोत्तम डोये व शेकडो गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्त्यांनी स्वागत करून पादुका पालखीचे दर्शन घेतले
पालखीसोबत मुख्य प्रचार प्रमुख दामोदरपंत पाटील गुरूजी प्रचार विभाग प्रमुख मनीदासजी टोंगे महाराज नागपूर विभाग प्रांत सेवाधिकारी सावरकर गुरुजी भंडारा जिल्हा सेवाधिकारी अहिल्याबाई गोखले प्रचारक एकनाथ गावत्रे राजेंद्र कठाळे प्रमोद देशमुख गजानन अजमिरे अजय यादव हभप मुक्ताबाई हत्ती मारे प्रामुख्याने उपस्थित होते
मुख्य प्रचार प्रमुख दामोदरपंत पाटील यांनी क्रांतीज्योती यात्रा व पादुका दर्शन पालखी संदर्भात आपले विचार व्यक्त करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामगीतेतून सध्याचे स्पर्धेच्या युगात युवकांना राष्ट्रसंतांच्या विचारांची गरज असून हे विचार घराघरात पोहोचवून गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून युवकांमध्ये स्फुर्ती व चांगली जीवन जगण्याची ची कला प्राप्त व्हावी या उद्देशाने या क्रांतीज्योत यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले माजी खासदार नानाभाऊ पटोले यांनी आपल्या देशाला अनेक शहिदाच्या बलिदानाने स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र पूर्वकाळात राष्ट्रसंताचे विचार तरुणांना व देशवासीयांना बळ व प्रेरणा देणारे होते पूर्वजांच्या
बलिदानाची जाणीव नवीन पिढीला व्हावी राष्टसंतांनी दिलेली ग्रामगीता आचरणात आणावी असे आवाहन केले प्रास्ताविक दादा फुंडे यांनी तर रत्नाकर बोरकर यांनी संचालन करून उपस्थितांचे आभार मानले पादुका पालखी दर्शन सोहळ्याला शेकडो गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते

blank