26.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home शैक्षणिक   दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्यास मुदतवाढ    

  दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्यास मुदतवाढ    

0
51

नागपूर, दि. 28: फेब्रुवारी –मार्च 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी खाजगीरित्या फॉर्म क्रमांक 17 प्रविष्ट होणाऱ्या‍ विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन प्रक्रियेद्वारे नियमित शुल्क भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे, असे विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

            नियमित शुल्काने नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्यासाठी  27 ऑगस्टपासून सुरुवात झाली असून, 10 सप्टेंबरपर्यंत ते विद्यार्थ्यांना भरता येतील. विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया बुधवार दि. 28 ऑगस्टपासून सुरु झाली असून, अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्रशाळेत तसेच कनिष्ठ महाविद्यालयात बुधवार दिनांक 11 सप्टेंबरपर्यंत जमा करता येणार आहेत. तर विद्यार्थ्यांकडून जमा करण्यात आलेली मूळ कागदपत्रे, अर्ज, विहित शुल्काची यादी विभागीय मंडळाकडे 16 सप्टेंबरपर्यंत जमा करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 1 हजार नोंदणी शुल्क आणि 100 रुपये प्रक्रिया शुल्क तर बारावीसाठी 500 रुपये नोंदणी शुल्क आणि 100 रुपये प्रक्रिया शुलक आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज https://form17.mh-ssc.ac.in तर 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठीhttps://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर भरावेत. विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना शाळा सोडल्याचा दाखला, मूळ प्रत नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधार कार्ड, स्वत:चा  पासपोर्ट  आकारातील फोटो स्वत:जवळ ठेवावा व ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत. विद्यार्थ्यांनी मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी 020-25705207/8 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.