33.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home क्रीडा  राष्ट्रीय क्रीडा दिनी रॅली, खेळाडूंच्या सत्काराचे आयोजन

 राष्ट्रीय क्रीडा दिनी रॅली, खेळाडूंच्या सत्काराचे आयोजन

0
29

वाशिम, दि. 29 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणजे २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन दरवर्षी साजरा केला जातो. या दिवशी २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या खेळाडूंनी राष्ट्रीय व आतरराष्ट्रीय स्तरावर तसेच अखिल भारतीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले असेल अशा खेळाडूंचा वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात येतो. यावर्षी सदर कार्याक्रमाचे आयोजन २९ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ९.३० वाजता वाशिम जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात येणार आहे. तसेच क्रीडा दिनानिमित्त सकाळी ९ वाजता शिवाजी विद्यालय येथून रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी यावेळी विद्यार्थी, युवकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी केले आहे.

जिल्ह्यातील मान्यता प्राप्त खेळामध्ये राष्ट्रीय, अखिल भारतीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केलेल्या जिल्ह्यातील खेळाडूंना खेळाच्या प्रमाणपत्राची सत्यप्रत साक्षांकित करुन २८ ऑगस्ट २०१९ रोजी वाशिम जिल्हा क्रीडा संकुल येथे सकाळी ११ वाजेपर्यंत सादर करावी. सत्कारमुर्ती खेळाडुंनी २९ ऑगस्ट २०१९ रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहावे. अधिक माहीतीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच जिल्हयातील उपरोक्त पात्रताप्राप्त खेळाडुंनी सत्काराकरिता नाव नोंदणी करण्याचे आवाहन वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

blank