27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथालय सेवक व कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथालय सेवक व कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

0
37

गडचिरोली,दि.५:- गडचिरोली येथील शिवाजी सार्वजनिक ग्रंथपाल रवींद्र माधवराव समर्थ यांना महाराष्ट्र शासनाचा सन २०१७-१८ चा डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार घोषीत झालेला आहे. कै. मधुकर गुलाबराव हिरापुरे , सचिव एकलव्य ग्रंथालय आरमोरी यांना मरनोत्तर उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.
यांची निवड नागपूर विभागातून झालेली असून रु. १५०००/- (पंधरा हजार रुपये) रोख, शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन दिनांक ११ सप्टेंबर २०१९ ला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे हस्ते गौरविण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील जनतेचे सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतीक जीवन समृध्द करण्यासाठी व वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे योगदान लाभावे ग्रंथालयाचा गुणात्मक विकास व्हावा यासाठी ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना डॉ. एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक व कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते.