वाशिम, दि. ०८ : पैनगंगा नदीवरील जिल्ह्यातील सर्व ११ बॅरेजचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे सर्व ११ बॅरेज पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे यानंतर मोठा पाऊस होऊन पाण्याची आवक वाढल्यास बॅरेजचे दरवाजे कोणत्याही वेळी उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागण्याची शक्यता आहे. तरी पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात जावू नये, अथवा आपली जनावरे नदीपात्रात सोडू नयेत, असा इशारा वाशिम पाटबंधारे विभागाने दिला आहे.




