
राज्यातील ४६ उपजिल्हाधिकाèयांच्या बदल्या,गोंदियाचे एसडीओपद नेत्यांच्या इच्छेसाठी रिक्त
चिचगडचे अप्पर तहसिलदार निवृत्ती उईके तर तिरोड्याचे तहसिलदार घोरुडे
गोंदिया,दि.०९ः-आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून भारत निवडणूक आयोगाच्या निकषानुसार महसूल विभागाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील तब्बल १०६ अधिकाèयांच्या व ७३ तहसिलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. यामध्ये गोंदियाचे निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक ज्यांना येऊन दोनवर्षही पुर्ण झालेले नाहीत त्यांची बदली वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून तर गोंदियाचे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांची गडचिरोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.वालस्कर यांची बदली भारतीय जनता पक्षाच्या राजकीय दबावात झाल्याची चर्चा असून त्याठिकाणी अद्यापही कुणाची नियुक्ती न मिळाल्याने भाजप जवळच्या अधिकाèयाला बसविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तर चिचगडच्या अप्पर तहसिलदार या नव्या पदावर वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसिलदार निवृत्ती उईके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तिरोडा तहसिलदार म्हणून अहेरीचे तहसलिदार पी.आर.घोरुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अनंत वालस्कर निवासी उपजिल्हाधिकारी गडचिरोली,भंडारा उपजिल्हाधिकारी प्रमोद भुसारी गोसेखुर्द क्र.२ उपजिल्हाधिकारी नागपूर,उपविभागीय अधिकारी मौदा वंदना सावरंगपते उपजिल्हा निवडणुक अधिकारी भंडारा,नितीन सदगीर उपविभागीय अधिकारी गडचिरोली यांची बदली उपविभागीय अधिकारी तुमसर पदावर,उमरेडचे उपविभागीय अधिकारी जनार्दन लाडे यांची जिल्हा पुनवर्सन अधिकारी चंद्रपूर येथे,उपजिल्हाधिकारी (बीड) प्रियंका पवार यांची बदली भुसंपादन उपजिल्हाधिकारी चंद्रपूर,नागपूर शहर उपविभागीय अधिकारी एस.पी.पांडे,राजशिष्टाचार उपजिल्हाधिकारी नागपूर,देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम निवासी उपजिल्हाधिकारी भंडारा,निवासी उपजिल्हाधिकारी वर्धा विजया बनकर यांची बदली भुसपांदन(सामान्य)उपजिल्हाधिकारी नागपूर येथे तर गोंदियाचे निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक यांची बदली उपविभागीय अधिकारी आर्वी या ठिकाणि करम्यात आली आहे.आर्वीचे उपविभागीय अधिकारी निशिकांत सुर्वे यांची महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ मुबंई येथे प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी पदावर,सावनेरच उपविभागीय अधिकारी संजय पवार यांची बदली झोपडपट्टी पुनर्विकास पुणे येथे,वर्धेचे उपजिल्हाधिकारी विठ्ठल जोशी यांची पंढरपूर विठ्ठल रुक्मीणी मंदीर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.




