संख[राजेभक्षर जमादार],दि.10ः-जत तालुक्यातील संख येथे सालाबाद प्रमाणे मुस्लीम समाज १० व्या दिवशी मोहरम ताबूत विसर्जन करण्यात आले.तसेच संख येथे दरवर्षी मोहरम साठी अनेक कार्यक्रम ठेवले जातात व या कार्यक्रमसाठी हिंदू -मुस्लीम समाज एकत्र येऊन साजरा करतात.यंदा ही लालसाबअली रिवायत मंडळ यांनी गायन कार्यक्रम व या मोहरम निमित्त उमदीचे सहा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर साहेब यांचा सत्कार लालसाबअली रिवायत मंडळ अध्यक्ष अशोक मुंडेवाडी यांनी केले.तसेच संखचे युवा नेते गुरूबसव पाटील सर यांचा ही सत्कार मंडळाकडून करण्यात आले.
यावेळी सहा.पो.नि.कोळेकर साहेब मोहर बदल बोलत होते कि संख हा एकमेव ठिकाण आहे कि मुस्लिम बांधवाच्यां मस्जिद समोरा समोर गणेश मंडळाने गणेश मुर्ती बसवले आहे .तर हिंदू -मुस्लिम समाज एकत्र सण साजरा करत आहेत.त्यामुळे हे हिंदू -मुस्लिम ऐक्याचे भावना दिसून येते.तसेच मुस्लिम समाज व हिंदू समाजला मोहरम व गणेश मंडळला शुभेच्छा दिले.यावेळी उपस्थित मान्यवर पोसहा.पो.नि.कोळेकर ,गुरूबसव पाटील सर ,डॉ.भाऊसाहेब पवार ,अशोक मुडेवाडी,आब्बास सैय्यद ,नबिसाहेब शेख,मैनुद्दीन जमादार ,मलीकसाहेब मुल्ला,बापू माने, रमजान जमादार,मुबारक सौदागर,राजेभक्षर जमादार,रफिक ममदापुर ,डॉ.रगु कोळी ,भिमाशकंर बिरादार आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच ताबूत विसर्जन निमित्त अन्न प्रसाद वाटप करण्यात आले.ताबुत विसर्जन बगण्यासाठी संख परीसरातील अनेक लोंक एकत्र आले होते ताबुत विसर्जन संपन्न झाला.





