25.1 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home शैक्षणिक जत तालुक्याला आणखी एक मानाचा तुरा!

जत तालुक्याला आणखी एक मानाचा तुरा!

0
42

जत(सांगली)दि.11ः-दुर्गम भागात जीवाचे रान करून विद्येचे उद्यान फुलवणारे,शाळा आणि विध्यार्थी विषयी निस्सीम प्रेम असणारे दिलीप वाघमारे यांचा शाळेला आयएसओ प्रमाणपत्र मिळवून दिल्याबद्दल काष्ट्राईब संघटनेकडून सत्कार करण्यात आला.अत्यंत दुर्गम आणि दुष्काळी अशा प्रतिकुल परिस्थिती शाळेत एकच शिक्षक कार्यरत असतानाही एकाकी झुंज देत तालुक्यात पहिली व्दिशिक्षिकी असलेल्या जि. प प्राथमिक मराठी शाळा बाबरवस्ती-पांडोझरीला ISO 9001:2015 मानांकन प्राप्त करुन देण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नामुळे ही शाळा संपुर्ण जिल्ह्यात नावारुपास आली आहे.यामुळे शैक्षणिक क्षेत्रात जत तालुक्याची मान आणि शान वाढली असल्याचे काॅस्टॅ्ाईब संघटनेने सत्काराच्यावेळी उदगार काडले.संघटनेचे कार्याध्यक्ष लखन होनमोरे यांनी वाघमारे यांच्या कार्याचा उल्लेख करीत त्यांची स्तुती केली.कार्यक्रमाला गजानन पाटील,बसवराज बिरादार,पिरप्पा ऐवळे,डी.एच,शिंगे ,अवांण्णा पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.