30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ आशा कर्मचार्‍यांची जिल्हा परिषदेवर धडक

आशा कर्मचार्‍यांची जिल्हा परिषदेवर धडक

0
36

गोंदिया,दि.12ः-आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी बुधवार, ११ सप्टेंबर रोजी भर पावसात आशा कर्मचार्‍यांनी जिल्हा परिषदेवर धडक देऊन धरणे आंदोलन केले.
जिल्ह्यातील दीड हजारावर आशा सेविका आरोग्य विभागाच्या नियंत्रणात ग्रामीण व शहरी भागात आरोग्य सेवा देत आहेत. या आशा कर्मचार्‍यांना एकत्रीत मानधन न देता कामानुसार कमीतकमी १ हजार ८00 ते २ हजार ५00 रुपये मानधन दिले जाते. तर गट प्रवर्तकांना प्रवास व दैनंदिन भत्ता मिळून ८ हजार ७२४ रुपये मानधन देण्यात येते. कामाच्या बदल्यात मिळणारा हा मोबदला अत्यंत तुटपुंजा असल्याने आशा कर्मचार्‍यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आशासेविकांना १0 हजार व गटप्रवर्तकांना १५ हजार रुपये वेतन देय करुन ६0 वषार्नंतर सेवानवृत्ती पेंशन लागू करण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या नेतृत्वात वेळोवेळी शासन व प्रशासनाकडे आशा कर्मचार्‍यांचा पाठपुरावा सुरु आहे. यादरम्यान, शासनाकडून आशा कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. मात्र अद्यापही तसा शासन निर्णय काढण्यात आलेला नाही.
त्यामुळे आशा कर्मचार्‍यांमध्ये रोष आहे. आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील आशा कर्मचार्‍यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले असून बुधवार, ११ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेवर धडक देऊन धरणे आंदोलन केले. दरम्यान, मागण्या त्वरीत मान्य करण्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यात आले असून, मागण्या मान्य होईपयर्ंत कामबंद आंदोलन सुरु राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.