गोंदिया ,दि.12ः: शहरातील रामनगर म्युनिसीपल हायस्कूल शाळेत मोहम्मदी वेलफेअर फाऊंडेशनच्या वतीने ८ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सभापती विश्वजीत डोंगरे, रामनगर पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे, सदर मस्जिद अहलेहदीसचे बाबाभाई नायब, सामाजिक कार्यकर्ता जुनेद भाई, व्हॉलीबॉल व खो-खो असोसिएशनचे सचिव सैय्यद वहाब, सदर कर्मज मस्जिदचे शकील अहमद, कौमी एकताचे सचिव खलील पठान, सामाजिक कार्यकर्ता मुजीब पठान उपस्थित होते. या रक्तदान शिबिराला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला असून फाऊंडेशनच्या सदस्यांनी व अनेक नागरिकांनी रक्तदान केले. दरम्यान रक्तदान करणार्यांना पाहुण्यांच्या हस्ते भेट वस्तू देवून त्यांना प्रोत्साहीत ही करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहम्मदी वेलफेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज खान, अयुब खान, जावेद कुरेशी, रिजवान शेख, वसीम खान, नदीम खान, वसीम खान, अरशद शेख, अब्दुल कय्युम, जिशान खान, रेहान खान, साकीर अली, सैय्यद वकार, अफजल शेख, साजिद शेख, साहीद शेख आदींनी सहकार्य केले.





