गडचिरोली,दि.15 : कॉम्प्लेक्स परिसरात दररोज फिरायला येणाऱ्या एका गटाकडून भामरागड मधील पूराच्या पाण्यात संकटांना सामोरे जात असलेल्या बांधवांसाठी मदतीचा हात दिला आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे अजूनही भामरागड परिसरामध्ये पूरस्थिती कायम असून कित्येक दुर्गम भागात अन्नपुरवठा व इतर जीवनावश्यक वस्तूंची गरज असल्याचे प्रशासनाने तीन दिवसांपूर्वीच सांगितले होते. त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणाहून मदतीचा ओघ जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच भामरागड येथे सुरू आहे. वर्तमानपत्रातील बातम्यांचा आधार घेऊन कॉम्प्लेक्स परिसरातील शासकीय, नोकरदार, उद्योजक व इतर मित्र मंडळी यांच्या वाडा नावाच्या गटाने भामरागड साठी मदतीचा हात दिला आहे. प्रशासनाने कळवले नुसार विविध वस्तूंचे १५० किट तयार करून आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत प्रशासनाला सुपूर्द केले. यावेळी गटातील संतोष कोलते, रूपेन्द्र गौर, मनोज कंगली, सरताज शेख, रामरेड्डी जिट्टावार, सुशील चांदेकर, स्वप्निल महल्ले, शिवशंकर भारसाकडे, सागर पाटिल, स्वामी एलेला, देवदत्त तारे, शिवाजी चेपटे, सारंग गावंडे, गोपाल अनासाने, रामदास भोसले, दिपक तायडे, महेंद्र बिसेन, नितन म्हस्के, यादव साहेब, रुपेश कोल्हे, जयराम मिश्रा, संदेश मडावी, जयेश आहेर, विनोद पोरेड्डीवार, विजय कटारे, लिलाधर भरडकर, अतुल हाडगे, अरूण कोरे, सुरेश कांती, प्रशांत सेगमवार, प्रशांत सांगाडे, प्रशांत उरकुडे, दिनेश रामटेके, हितेश चरडे व रवी रालाबंडी सदस्य उपस्थित होते.भामरागड मधील पूरग्रस्तांसाठी अशा प्रकारच्या मदतीमुळे हातभार लागणार असून पूरस्थिती दरम्यानच्या उपाययोजनांसाठी चांगली मदत मिळत आहे.





