29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ शास्त्रीवार्ड पोवार समाजाची वार्षिंक आमसभा उत्साहात;अध्यक्षपदी अनिल टेंभरे

शास्त्रीवार्ड पोवार समाजाची वार्षिंक आमसभा उत्साहात;अध्यक्षपदी अनिल टेंभरे

0
43

गोंदिया,दि.15ः-येथील शास्त्रीवार्ड पोवार समाज संघटनेची आमसभा डाॅ. के.एस.पारधी यांच्या सभागृहात महत्वाच्या निर्णयासह उत्साहात पार पडली.आमसभेच्या अध्यक्षस्थानी से.नि.अभियंता  संघटनेचे अध्यक्ष झेड.पी.रंहागडाले होते.यावेळी नव्या कार्यकारीणीची सुध्दा निवडणुक घेण्यात आली.त्यामध्ये अध्यक्षपदी अनिल टेंभरे तर सचिवपदी खुशाल कटरे यांची निवड करण्यात आली.
आमसभेत सभासदांनी विविध समाज उपयोगी उपक्रमाच्या आयोजनास्तव चर्चेमध्ये सहभाग घेतला.त्यामध्ये जी.एस.रंहागडाले,पी.आर.पारधी,डाॅ.संजिव रंहागडाले,रविंद्र पारधी,डाॅ. नारायण बिसेन,मोरेश्वर रंहागडाले,बी.डब्लु.कटरे,खुशाल कटरे,छत्रपती कटरे,अरूण कटरे,ओमेश चौधरी,बी.के.हरिणखेडे,राजेंद्रनाथ रंहागडाले,दिवाकर बिसेन,राजकुमार चौधरी,खुपचंद पटले,चंद्रप्रकाश ठाकरे,शकंर जैतवार,रविकुमार पटले,अॅड.कृष्णा पारधी,यशवंतराव भगत,दादीलाल रंहागडाले,हो.सु.बिसेन,एच.पी.पटले,अशोक कटरे,अनिल टेंभरे,मोहनलाल अंबुले,कवेश्वर पारधी,गुणवंत ठाकुर,भुषणलाल पारधी,आर.बी.बिसेन,संजय पटले,डाॅ. के.एस.पारधी,गोपाल रंहागडाले,साहेबलाल पारधी,ओमेश्वर पारधी,वैभव चौधरी,टेनीलाल बिसेन,डी.के.कटरे यांचा समावेश होता.या आमसभेत जमा खर्चाला मंजुरी देण्यात आली तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,शरदपौर्णिमा उत्सवाचे आयोजन संघनटेची नोंदणी करणे,शास्त्रीवार्ड पोवार समाज संघटनेच्या अधिनस्थ महीला व युवक समीतीचे गठण करण्यावर चर्चा करण्यात आली.

शास्त्रीवार्ड पोवार समाज संघटनेच्या अध्यक्षपदी अनिल टेंभरे व सचिवपदी खुशाल कटरे 
गोंदिया येथील शास्त्रीवार्ड पोवार समाज संघटनेच्या तिन वर्षिय कार्यकारिणीची निवडणूक 14सप्टेंबरला वार्षिंक आमसभेत घेण्यात आली.निवडणूक अधिकारी म्हणून से.नि.अभियंता  झेड.पी.रंहागडाले हे होते.सत्र 2019-2020 ते 2022-2023 या तिन वर्षिय कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी अनिल टेंभरे व सचिवपदी प्राचार्य खुशाल कटरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष बी.डब्लु. कटरे,सहसचिव मोहनलाल अंबुले,कोषाध्यक्ष डाॅ. के.एस.पारधी,प्रचार प्रमुख टेनिलाल बिसेन,सांस्कृतिक प्रमुख यशवंतराव भगत, सदस्य शंकर कटरे,सदस्य अरूणकुमार कटरे,छत्रपती कटरे,राजकुमार चौधरी,खुपचंद पटले,डाॅ. नारायण बिसेन,मार्गदर्शक झेड.पी.रंहागडाले,पी.वाय.ठाकरे,डाॅ. संजिव रंहागडाले यांचा समावेश आहे.आमसभा व निवडणुकीचे संचालन संचालन पन्नालाल ठाकरे यांनी केले.