आमगाव,दि.15ःयंदा पावसाने राज्यात थैमान घातले. पावसामुळे नाशिक, कोल्हापूर व गडचिरोली जिल्ह्यातील जीवनमान अस्ताव्यस्त झाले. अनेक कुटूंब उघड्यावर आले. या आपादग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी पद्मपूर येथील यशोदा बहुउद्देशिय विकास संस्था व उडान बहुउद्देशिय विकास संस्थेतर्फे आमगाव येथे मदत संकलन रॅली काढण्यात आली.
ह्यमदत करा, मदत करा, आपादग्रस्तांना मदत करा असे नारे देत आंबेडकर चौकातून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. गर्ल्स हायस्कूल साखरीटोला येथील मुख्याध्यापक जी. टी. फुंडे यांनी पहिली मदत देऊन रॅलीची सुरुवात केली. ही रॅली आमगावच्या मुख्य मागार्ने पेटड्ढोलपंप चौक, संत जगनाडे चौक, मानकर चौक, गांधी चौक, शितला माता मंदिर चौक होत पाणी टाकी चौकातून परत मुख्य मागार्ने आंबेडकर चौकात परतली. आमगावातील व्यापाड्ढयांनी व नागरिकांनी सढळ हाताने मदत केली. रॅलीत यशोदा बहुउद्ेशिय विकास संस्थेचे रविकांत पाऊलझगडे, नरेश रहिले, विजय कोरे, प्रेमानंद पाथोडे, जितेंद्र फुंडे, शैलेश लक्षणे, सचिन तलमले, मोहित फुंडे, प्रदीप कावरे, दीपक भांडारकर, सचिन ढोक, मुकेश डोंगरे, निखील बहेकार, अजय शेंडे, प्रज्वल शेंडे, अनिकेत चुटे, अरविंद बागडे, रोहित मुनेश्वर, किरण कदम, अतूल फुंडे, मुख्याध्यापक शरद उपलपवार, मनोज तिवारी, सेवानवृत्त शिक्षक परसराम पटले, अवि पाऊलझगडे, अश्विन बोहरे, आकाश बडगे, नरेश येटरे, आशिष तलमले, रोशन बोहरे यांनी रॅली सहभाग घेऊन मदत निधी उभाण्यात हातभार लावला. या रॅलीच्या माध्यमातून उभारण्यात आलेला निधी मुख्यमंत्री सहायता निधीत दिला जाणार आहे.





