
अर्जुनी मोर.,दि.16 :-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या गोंदिया जिल्ह्याध्यक्षपदी अर्जुनी मोर. चे युवा पत्रकार राधेशाम भेंडारकर यांची नियुक्ती करण्यात आली.मराठी पत्रकार संघटनेचे राज्य अध्यक्ष राजा माने,राज्य संघटक संजय भोकरे,कार्याध्यक्ष वसंत मुंडे,विदर्भ पुर्व प्रमुख महेश पानसे,यांचे सुचनेनुसार राधेशाम भेंडारकर यांची मराठी पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. संघटनेच्या ध्येयधोरणानुसार आपल्या कार्यक्षेत्रात संघटना मजबूत करण्याचे दृष्टीने प्रयत्न करण्याचे राधेशाम भेंडारकर यांना सुचीत करण्यात आले आहे. राधेशाम भेंडारकर यांची मराठी पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल संतोष बुकावन, सुरेंद्रकुमार ठवरे, वासुदेव साधवानी,ओमप्रकाशसिंह पवार, श्रीधर हटवार,अश्विन गौतम, संतोष रोकडे,अमर ठवरे,मुन्ना नंदागवळी, तथा अर्जुनी मोर तालुक्यातील सर्व पत्रकार व चाहत्यांनी अभिनंदन केले आहे.





