35.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ जेव्हा घरकुल जाते चोरीला तेव्हा;लाभ तर मिळालाच नाही पैसे मात्र दुसऱ्याच्या खात्यात

जेव्हा घरकुल जाते चोरीला तेव्हा;लाभ तर मिळालाच नाही पैसे मात्र दुसऱ्याच्या खात्यात

0
84

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे)दि.17ःःघरकुल चोरीला जाऊ शकते का विश्वास तर बसत नाही पण हे अगदी खरे आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाराभाटी ग्रामपंचायत अंतर्गत ब्राह्मणटोला येथील नरहरी केवळ राम मुंडे यांचे घरकुल चोरीला गेले आहे. चोरीची मात्र अद्यापही पोलीस ठाण्यात तक्रार झाली नाही, मात्र हे घरकुल कोणी वाढविले याचा शोध अर्जुनी मोरगाव पंचायत समिती घेत आहे.
ब्राह्मणटोला येथील रहिवासी नरहरी फुंडे यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले सन 2017 18 ऑनलाइन यादीत त्यांचे नाव आहे. पंचायत समिती कार्यालयात मार्फत यांना मंजुरीचे पत्र देण्यात आले नाही. घरकुल मंजुरीचे पत्र मिळाले नाही म्हणून त्यांनी फाईल कार्यालयाकडे सादर केली नाही. वर्षभरापूर्वी पासून ते घरकुलाची स्वप्न आहेत मात्र घरकुल मिळेना घरकुलाचे काम ऑनलाईन झालेले आहे. साधारण व्यक्तीलाही पाहता येते घराशेजारी आलेल्या पाहुण्या कवी त्यांनी ऑनलाईन पाहणी केली त्याने बघितले आणि आश्चर्याचा धक्काच बसला. ऑनलाइन प्रणालीत त्यांचे घरकुल तयार होऊन यांना एक लाख तीस हजार रुपये मिळाल्याचे दर्शविण्यात आले. प्रत्यक्षात मात्र नरहरी यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही आणि घरकुल ही झाले नाही. त्यांनी थेट पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधला घडलेला प्रकार गटविकास अधिकारी यांना सांगितला. त्यांनी लेखी तक्रार करण्यास सांगितल्यानुसार तक्रार करण्यात आली.त्यानंतर गटविकास अधिकारी मयूर अंदेलवाड स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक चौधरी यांनी बाराभाटी येथे जाऊन चौकशी केली असता नरहरी यांच्या खात्यात पैसे जमा न होता हे पैसे राष्ट्रपाल माने यांच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आले.या पैशाची घरकुल प्रणालीच्या ऑनलाइन दस्तऐवजात नरहरी पुंडे यांचे नावे नोंद झाली आहे. हा अपलातून चमत्कारच कसलाही कारभार केला नसताना फुंदे यांचे नावे एकदा नोंद झाल्यामूळ त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही अभियंत्याच्या चुकीमुळे या योजनेपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. इतर घरकुलाचा आणखी बसण्याची शक्यता नाकारता येत नाही अर्जुनी मोरगाव पंचायत समिती अंतर्गत सर्वच घरकुलांची विशेष यंत्रणेमार्फत चौकशी करणे गरजेचे झाले आहे
अभियंत्यांचा संपला कंत्राट
घरकुल योजनेच्या कामासाठी खाजगी संस्थेच्या माध्यमातून कंत्राटी अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे या प्रकरणात कंत्राटी अभियंता कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या अभियंत्याचा कंत्राट सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपला आहे.त्यामुळे यासाठी कुणाला जबाबदार धरले जाते हा प्रश्न ऐरणीवर आला आहे

blank