29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ चुकीच्या धोरणांच्या माध्यमातून सरकार ओबीसींचे हक्क नाकारतेय-बबलू कटरे

चुकीच्या धोरणांच्या माध्यमातून सरकार ओबीसींचे हक्क नाकारतेय-बबलू कटरे

0
34

आमगाव,दि.18:देशातील ज्या काही सरकार आजपर्यंत आल्या आणि गेल्या त्या सर्वांनीच शेतकरी विरोधी धोरणांचा अवलंब करुन चुकीच्या धोरणांची अमलबजावंणी केल्याने कामगारांचे रोजगार संपले तर शेतीबद्दल समाजात अनास्था निर्माण झाल्यानेच शेतकèयांच्या आत्महत्याचे प्रमाण वाढले.त्यातच शेतीपासून उद्योगापर्यंत आणि शासकीय नोकèयांचे खाजगीकरण केल्याने या देशातील ओबीसी एससी एसटी समाज हा आपल्या सqवधानिक हक्कापासून वंचित राहिल्याचे विचार ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे यांनी व्यक्त केले.
ते सामाजिक एकता मंच आमागवच्यावतीने मागासवर्गीय, ओबीसी, एससी,एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी, धार्मिक अल्पसंख्याक, समस्याग्रस्त समाजाच्या हक्क अधिकारासाठी १५ सप्टेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आयोजित जनचेतना महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून प्रा.श्रीकांत भोवते, नुतन माळवी, चेतन उईके, मेहताबभाई खान उपस्थित होते.तर विचारमंचावर  हरिश ब्राम्हणकर, मोहम्मद मुश्ताक शेख, लिलाधर गिèहेपुंजे, क्रांती ब्राम्हणकर, वाय.सी. भोयर, शंकर नागपुरे, राजेश सातनुरकर, बालू वंजारी, भरत वाघमारे, जनार्धन qशगाडे,रमन हुमे, यादव मेश्राम, आनंद बन्सोड, सुनिता हुमने, प्रकाश ब्राम्हणकर, ब्रम्हानंद बुलाखे, प्यारेलाल जांभुळकर गितेश मेश्राम आदि उपस्थित होते.यावेळी बोलतांना कटरे पुढे म्हणाले की,शिक्षणाचे बाजारीकरण करण्याचे षडयंत्र या सरकारने रचले असून २०१९ मध्ये शिक्षणात बदल करण्याचे धोरण सरकारने जे अवलqबले आहे,ते शिक्षणापासून वंचित करणारे आहे.या देशाचा सर्वात मोठा घटक असलेल्या ओबीसी समाजाची जनगणना होऊ दिली जात नाही,कारण काय तर या समाजाची जनगणना झाली तर त्यांना त्यांच्या जनगणनेतील आकड्यानुसार सर्व क्षेत्रात वाटा द्यावा लागेल.केंद्र सरकार असो की राज्य सरकार आजही ओबीसीं मुलांच्या शिष्यवृत्तीचे पैसे देऊ शकलेली नाही.ओबीसीमध्ये चुकीचा संदेश पसरवून सqवधानिक हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी सेव मेरीटच्या नावावर या देशातील सरकार आंदोलन चालवून ओबीसींच्याच खांद्यावर बंदूक ठेवून ओबीसींचे हक्क हिरावून घेण्याचे काम करीत असल्यानेच ओबीसी समाजात गैरसमज निर्माण झाल्याचे म्हणाले.चुकीच्या सरकारी धोरणामुळे कामगार जातीेंचे रोजगार संपले-त्यामुळे शेतीबद्दल अनास्था निर्माण झाली.बेरोजगारी वाढली आहे,परंतु शिक्षित युवकांना अजूनही त्या मागचे मुख्य कारण कळले नसल्याचे म्हणाले.
देशातील नोकरीसंदर्भांत लोकसभेतील २०१९ च्या अधिवेशनात तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने विचारलेल्या प्रश्नावर मंत्र्यांनी जे उत्तर दिले त्याकडे बघितल्यास ओबीसी हा केंद्रातील नोकरीत कुठेच नसल्याचे दिसून येते.सचिवालयातील प्रधान सचिवामध्ये ८९ जागा पैकी एससी-१,एसटी ३,ओबीसी ० अशी स्थिती आहे.अतिरिक्त सचिवांच्या ९३ पदांमध्ये एससी ६,एसटी ५,ओबीसी ०,सहसचिवांच्या ७५ पदापैकी एससी १३,एसटी ९६ तर ओबीसी १९अशी स्थिती असतानाही ओबीसीच्या जागेवर कुणी हक्क मारला याचा शोध ओबीसींनी खुल्या डोळ्याने नव्हे तर विचाराने करण्याची गरज असल्याचे म्हणाले.
२०११ ची जगणननेत अनुसूचित जातीची १६.६९, अनुसूचित जमातीची ८.६ टक्के लोकसंख्या मोजण्यात आली. मात्र ओबीसींची जनगणना करण्यात न आल्याने त्यांचा आकडा कळू शकला नाही.ओबीसी हा एका विशीष्ट समाजाला हुशार समजून अंश्रद्धेत जगत आहेत. हा समाज लिडर बेस समाज झालेला आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र qसग यांनी संसदेत दिलेल्या उत्तराचे अवलोकन केल्यास क व ड वर्ग नोकरीमध्ये २०१५ या वर्षात ९० टक्के घट झालेली आहे. तर अ वर्गात ११.७७ तर ब वर्गात १२.३९ टक्के नोकरी कमी झालेल्या आहेत.भारतात धर्मातील भक्ती आत्मयाच्या व मुक्तीचा मार्ग आहे. परंतु राजकारणात भक्ती qकवा व्यक्तीपूजा ही गुलामी, पतन व अंतिम हुकूमशाहीकडे नेणारा मार्ग असल्याने याचा विचार करायला हवे असेही ते म्हणाले.उद्योग, व्यापारात एकीकडे मक्तेदारी तर दुसरीकडे जुनी पेंशन योजनेला विरोध हे मनुवादी धोरणाचे षडयंत्र आहे. ज्या समाजाचे संगठन असतो तोच समाज आपल्या हक्कासाठी लढा देतो, आणि समाज qजकतो असे कटरे म्हणाले.
यावेळी मेहताबभाई बोलतांना म्हणाले की, भारतात मुस्लीम समाजाचे सर्वात प्रथम आगमन कोठे झाले असेल तर ते केरळ राज्यात. झालेले आहे. राणी लक्ष्मीबाई यांचा सेनापती असलेला अमीर बेग सलाम हा निष्ठावंत भारतीय राणी लक्ष्मीबाईच्या मार्गदर्शनात लढत होता. यावेळी नुतन माळवी यांनीही विचार व्यक्त केले. श्रीकांत भोवते बोलतांना म्हणाले की, सध्या आपल्या समाजाला अस्मितेची लढाई लढण्याची वेळ आली आहे. ५० टक्क्यावरील आरक्षण ७० वर पोहोचल्याने भाजप सरकार आरक्षणविरोधी आहे हे कसे म्हणता येईल असा प्रश्न उपस्थित करीत ते आरक्षणाचे समर्थक आहेत का असेही म्हणता येणार नाही असे म्हणाले. चेतन उईके यांनी शेतकरी आत्महत्या, सुक्ष्म कर्ज वसुली आणि बेरोजगारीमुळे देश संकटात असल्याचे विचार व्यक्त केले. शेतकèयांना त्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने व्यापाèयाकडे अल्प दरात विक्री करण्याची वेळ आल्याचे म्हणाले. शेतकरी ज्या दिवशी डोक्यातून पक्ष धर्म, जात काढेल त्या दिवशी स्वताच्या विकासाची दारे उघडी करील. अन्यथा या सर्व षडयंत्रात मारला जाईल असे विचार व्यक्त केले.कार्यक्रमाला मोठ्या ंसख्येने बहुजन समाजबांधव उपस्थित होते.